पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके
पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना पुस्तके
ओरोस
प्राथमिक शाळेतील पहिली ते
आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी ५७ हजार ४६८ पुस्तके दाखल झाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ती विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहेत. दरम्यान, यावर्षीपासून त्याच पुस्तकात धडा संपल्यानंतर ‘माझी नोंद’ या सदराखाली वहीचे एक पान समाविष्ट करुन देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ते नोट्स काढण्यासाठी वापरता येणार असल्याची माहिती
प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली…
प्राथमिक शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी देवगड दोडामार्ग ८४६०, २७३९, कणकवली ९४१४, कुडाळ ११९७२, मालवण ६२५६, सावंतवाडी १०४२२, वैभववाडी – ३१३४, वेंगुर्ले ५०७१ अशी एकूण – ५७४६८ पुस्तके प्राप्त झाली आहेत.

