बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे आठ फुटी मगर रस्त्यावरच अवतरली..
▪️वनविभागाने सदर मगरीचा तत्काळ बंदोबस्त करावा; ग्रामस्थांची मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.३०: बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.१ जवळ काल रात्री आठ फुटी मगर रस्त्यावरच अवतरली. केणीवाडा येथे गेल्या मे महिन्यामध्ये वनविभागाच्या हातातून निसटलेली ती मगर असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. वनविभागाने सदर मगरीचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
न्हावेली येथून बांदाच्या दिशेने जात असलेले दुचाकीस्वार सालु फर्नांडीस यांना रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाडलोस जि.प. शाळा नं. १ येथे रस्त्याच्या डाव्या बाजूने आठ ते दहा फुटी महाकाय मगर दिसली. फर्नांडीस यांनी गाडीचा हॉर्न वाजविताच मगर लगतच्या पाणथळ भागात गेल्याचे फर्नांडीस यांनी सांगितले.
मे महिन्याच्या दरम्यान केणीवाडा येथे एका तलावात मगर चिखलात रुतली होती. वनविभागाला कळवूनही उशिरा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना ती मगर सापडली नाही. याची माहिती भाजपा सावंतवाडी युमामोर्चा चिटणीस काका परब यांनी वनविभागाला दिली होती व मगरीला पकडण्याची मागणी त्यावेळी केली होती. परंतु आता त्या तलावापासून काही अंतरावरच सदर मगर वाहनचालकाच्या दृष्टीस पडल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

