कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

वंदे भारत’च्या ‘शेड्युल ची अद्याप निश्चिती नाही

वंदे भारत’च्या ‘शेड्युल ची अद्याप निश्चिती नाही

कणकवली

ओडिसा राज्यातील बालासोर
जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे ३ जूनला होणारे लोकार्पण रद्द झालेल्या अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण सद्यस्थितीत तरी लांबणीवर पडले आहे. या ट्रेनचे ‘शेड्युल ही अद्याप आमच्याकडे प्राप्त झाले नसल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सीएसटी ते मडगाव अशी धावणार असलेल्या ‘वंदे भारतला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली. थिवी या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत. ३ जूनचे लोकार्पण रद्द झाल्यानंतर ही ट्रेन सोमवार ५ जूनपासून सुरु होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ट्रेनचे लोकार्पण कधी होणार, याची अद्यापही निश्चिती नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले. अर्थात ही अत्याधुनिक, हायस्पीड रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर धावताना कधी दिसणार याची उत्सुकता कोकणवासीयांना लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!