कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “तो” रूतलेला युवक अखेर स्वतः च्या प्रयत्नानंतर आला बाहेर..

🟥 या प्रकारानंतर या युवकाचा जणू पूनर्जन्मच झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०२:-* सावंतवाडी येथील मोती तलावाच्या गाळ काढण्याचे काम सुरु असतानाच या दलदलीत एक युवक रुतल्याचा प्रकार घडला आहे. राजवाड्याच्या समोरील भागात भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. याच भागात तो चालत जात असताना तो दलदलीत रुतला. सिद्धाप्पा चन्नाप्पा बिजी (३५, रा. बेळगांव, सध्या रा. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, काही कालावधीनंतर त्याने स्वतः उलट्या दिशेने हात पाय मारत तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर अर्ध्या तासानंतर त्याच्या प्रयत्नांना यश आले व तो सुखरुपपणे बाहेर पडला. तो बाहेर पडताच उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

यावेळी उपस्थित माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी त्या युवकाच्या धाडसाचे कौतुक केले. तर उपस्थितांनी त्याच्या या जिद्दीला सॅलूट केले. अक्षरशः मरणाच्या दारातूनच परत फिरला. यावेळी उपस्थित नागरिकांनी जिवन मरणाचा खेळ याची देही याची डोळा अनुभवला. कारण तो आणखी थोडा पुढे गेला असता तर पूर्णपणे रुतून त्याच्या जीवावर बेतले असते.

यावेळी ‘वाहतूक पोलीस राजा राणे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुनील प्रभू केळूसकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरीक या ठिकाणी उपस्थित होते. तर बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. या प्रकारानंतर या युवकाचा जणू पूनर्जन्मच झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!