मालवण शहराचा विकास यापुढे लाखात नव्हे तर कोटीतच; खासदार विनायक राऊत
▪️पाच कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : मालवण
🎴मालवण,दि.२९: शहरात सुमारे पाच कोटी निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आमदार दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
दरम्यान, मालवण शहराचा विकास आता लाखात नव्हे तर कोटीत होईल, असे सांगत मालवण शहराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. तर आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जी कामे सुचवतील ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, शिंदे, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक मंदार केणी, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज सादये, गणेश कुशे, जगदीश गावकर, आप्पा लुडबे, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, जोगी, काँग्रेसचे बाळू अंधारी, पल्लवी तारी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अँड. पलाश चव्हाण यांनी केले.
यावेळी आम. केसरकर म्हणाले, जिल्ह्यात ठेकेदारांची लॉबी कार्यरत असल्याने एक ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने ती अपूर्ण राहत आहेत. हे जिल्ह्याला लागलेले ग्रहण आहे. ठेकेदारांना पालकमंत्री वठणीवर आणतील, असा विश्वास आमदार केसरकर यांनी व्यक्त केला.
आम. वैभव नाईक म्हणाले, येथील रस्त्यां बाबत जनतेची नाराजी आपण जाणून आहोत. या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मालवण विकसित व्हावे अशी नागरिकांची इच्छा असून फिश अक्वेरियम, नळपाणी योजना, सुसज्ज जेटी, बस स्थानक व सिनेमा गृह विविध कामे येत्या काळात पूर्ण होतील, असेही नाईक म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांनी सर्व कामांची माहिती देत आपण पाहिलेले म्युझिकल फाउंटनचे स्वप्न आज पूर्ण झाले. असे सांगत सर्वांचे आभार मानले.
५ कोटींची भूमिपूजन कामे
अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजनेतून मालवण नगरपरिषद येथे अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम. या प्रकल्पासाठी २ कोटी एक लाख ४ हजार निधी मंजूर. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर योजनेतून १ कोटी ८१ लाख ३७ हजार निधीतून सोमवरपेठ येथे भाजी मार्केट इमारत बांधकाम करणे. वैशिष्टपूर्ण योजनेतून १ कोटी २५ लाख निधीतून धुरीवाडा साईमंदिर जवळ मालवण नगरपरिषदेचे जलतरण प्रशिक्षण व क्रीडा संकुल ठिकाणी प्रमाणित बॅडमिंटन हॉल उभारणी. या तीन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.
सुदेश आचरेकर यांना पालकमंत्र्यांनी खुली ऑफर
पालकमंत्री उदय सामंत व खासदार राऊत यांनी आपल्या भाषणात सुदेश आचरेकर यांचे नाव घेत शाब्दिक टोलेबाजी केली. पालकमंत्री सामंत म्हणाले आमदार नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मालवणात आणण्यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मालवणचे वैभव आणखी वाढणार आहे. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आता विचार करावा, असे पालकमंत्री म्हणाले. यावर आचरेकर यांनी हात जोडले. पालकमंत्री म्हणाले नुसते हात जोडू नका, तर यावर विचार करा. आपल्या भाषणाचा समारोप करतानाही पालकमंत्र्यांनी पुन्हा आचरेकर यांना सूचित करत विचार करा आणि निर्णय घ्या, असे सांगितले. पालकमंत्र्यांनी आचरेकरांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर सर्वांसमक्ष दिली.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_