कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 न्यायालयाचा अवमान करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करा ; भाईप समाजाची मागणी..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-२९:-* भाईप व पंडीत यांचा श्री देवी माऊली व श्री देव रवळनाथ या देवस्थानचा वाद असून सदरच्या मंदिरामध्ये दि. २७/०५/२०२३ ते दि. २९/०५/२०२३ रोजी होणाऱ्या देवी कार्यक्रमास बंदी लागावी असा आदेश दिलेला होता. त्याप्रमाणे आपले न्यायालयाकडून सदर कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ नुसार बंदी आदेश पारीत केला होता. परंतु पंडीत समाजाने सदरच्या कार्यक्रमासाठी श्री देवी माऊली मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून लाऊड स्पीकर, ढोलताशे लावून, निमंत्रण पत्रिका छापून जाहीरपणे दि.२७/०५/२०२३ पासून पेपाहुण्यांना निमंत्रित करुन कार्यक्रम यशस्वी चाल केला आहे. कास गावातील लोकांची फोजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ मोडण्याच ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे मा. कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश मोडण्याच पायंडा महाराष्ट्रामध्ये पडणारा आहे.त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भाईप समाजाने लेखी निवेदनाद्वारे तहसिलदार सावंतवाडी यांच्या कडे केली आहे.

फोजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ लागू केल्यानंतर २०० मीटरच आतमध्ये ५ पेक्षा जास्त माणसांचा जमाव करता येत नाही. परंतु कास मध्ये सामनेवाला यांनी १४४ कलमाला आव्हान दिलेले आहे. एकंदरीत सामनेवाला यांनी मा. कार्यक दंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन मे. कोर्टाचा अवमान केलेला आहे. त्या संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भाईप समाजाने केली आहे.

यापुर्वी चालू शिमगोत्सवामध्ये अशाचप्रकारे आमच्या वाडीवर येऊन आमच्या मंदिरासमोर राडेबाजी करण्यात आली होती. जमाव करुन येऊन आमच्यावर हल्ला करण्यात आला होता. सदरचा हल्ला करण्यात व आजचे कलम १४४ मोडण्यास कास गावचे सरपंच हे स्वतः पुढाकार घेऊन लोकांना आदेश मोडण्यास प्रवृत्त करुन दहशत माजवण्यावर प्रथम क्रमांकावर आहेत.असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

फौजदारी प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ चा भंग केल्यामुळे सामनेवाला यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा व तसे आदेश पोलीस ठाणे बांदा यांना पारीत करण्यात यावा. संबंधित सामनेवाला यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तहसिलदार कार्यालयासमोर आम्हास बेमुदत उपोषण करणे भाग पडणारे आहे. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनावर

पुंडलिक रामा भाईप. अनिल भास्कर भाईप,लाडू दत्ताराम भाईप,. खेमराज रामचंद्र भाईप,न्हानु शंकर भाईप,. मनोज सिताराम भाईप,श्री. विठोबा गणेश भाईप,श्री. अजित विनायक भाईप यांच्या सह्या आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!