🟥 महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पत्रकार निलेश मोरजकर यांना “द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड”प्रदान..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा , दि-२९:-* साखळी-गोवा येथील रवींद्र भवनात महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात येथील ‘सकाळ’चे बातमीदार निलेश मोरजकर यांना ‘द प्राईड ऑफ इंडिया: भास्कर अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक तथा पद्मश्री विनायक खेडेकर,प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री अँड. रमाकांत खलप, फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार,कामगार नेते अँड. अजितसिंह राणे,गोवा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक,गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जीवन जवारे, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, कार्याध्यक्ष इम्तियाज मुजावर,मनीषा लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारिता, विज्ञान,तंत्रज्ञान, सामाजिक, शेतीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील गुणिजनांचा गौरव आणि प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. तीच आपली संस्कृती आहे, असे मत यावेळी विनायक खेडेकर यांनी व्यक्त केले.
ऍड.खलप यांनी राज्य,प्रांत यापेक्षा देश महान आहे. यासाठीच देशातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्य कर्तृत्वाने चमकणाऱ्या हिऱ्यांना हेरून महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनने त्यांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्याच्या हेतूने घडवून आणलेला हा सत्कार सोहळ्याचा उपक्रम अतिशय उत्कृष्ट असल्याचे सांगितले.
बातमीदार निलेश मोरजकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २० वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री विनायक खेडेकर व अँड. रमाकांत खलप यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
श्री.मोरजकर हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांचे पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देखील योगदान आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा सहभाग आहे.ते येथील बांदा केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात विविध व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा बनली आहे. येथील नट वाचनालयचे ते संचालक आहेत. बांदा मराठा समाजाचे संस्थापक असून मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.यावेळी महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

