आरोग्यकोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🟥मालवणात भर रस्त्यात १०८ रुग्णवाहिका पडली बंद

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.२९:* एका वयोवृद्ध रुग्णाला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी मालवण ग्रामीण रुग्णालयाची १०८ रुग्णवाहिका भर रस्त्यातच बंद पडली. नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या दिशेने धाव घेत प्रथम रुग्णाच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली. त्यानंतर धक्का देत रुग्णवाहिका रस्त्याच्या एका बाजूला उभी केली. नंतर खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून रुग्णाला जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. रविवारी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 

रुग्णवाहिका बंद पडून रुग्णाला काही झाले असते, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयापासून – साधारण दोनशे मीटर अंतरावर ही रुग्णवाहिका बंद पडली. विशेष म्हणजे बंद पडलेली ही १०८ रुग्णवाहिका महिन्याभरापूर्वीच पर्यायी रुग्णवाहिका म्हणून ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध झाली होती. सुमारे अर्धातास रुग्ण ताटकळत

वयोवृद्ध उपचाराची रुग्णाला अधिक

निकड लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका ओरोसला निघाली होती. दुपारी ११.३० च्या सुमारास ती भर रस्त्यातच बंद पडली. चालकाने रुग्णवाहिका पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच, त्याने स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका ढकलत रस्त्याच्या एका बाजूला आणून उभी केली. त्यामुळे वाहतुकीची कोंडीसुद्धा टळली.

 

दरम्यान, पर्यायी रुग्णवाहिका बंद पडल्यानंतर दुसरी रुग्णवाहिका तातडीने ओरोसहून मालवणला पाठविली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कळविण्यात आले. मात्र, रुग्णाला तातडीने ओरोसला नेणे गरजेचे असल्याने खासगी रुग्णवाहिकेचा पर्याय अवलंबिण्यात आला. या प्रकारात अर्धा तास रुग्णाला ताटकळत सहवे लागले. रुग्णालयासाठी आता दोन १०८ रुग्णवाहिका सज्ज असाव्यात, अशी मागणी होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!