कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कास गावच्या देवस्थानचे कार्यक्रम करण्यास 29 मे पर्यंत दोन्ही पार्टीना बंदी.

कास गावच्या देवस्थानचे कार्यक्रम करण्यास 29 मे पर्यंत दोन्ही पार्टीना बंदी.

सदरच्या कालावधीमध्ये पंडित व भाईप या दोन्ही पार्टीना मंदिर परिसरात प्रवेश बंदी

कास गावच्या श्री देवी माऊली व श्री देव रवळनाथ मंदिरात २७ हे पासून २९मे पर्यंत होणाऱ्या देवस्थानच्या वार्षिक उत्सव कार्यक्रमास दोन्ही घटना बंदी घालण्यात आली आहे हा आदेश तहसीलदार उंडे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पारित केला आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार कार्यकारी दंडाधिकारी सावंतवाडी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आपल्या अधिकारांचा वापर करून सदरचा आदेश पारित केला आहे या कालावधीत दोन्ही पार्टीतील असामीना मंदिर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
‌. सावंतवाडी तहसीलदार उंडे यांनी दिलेल्या आदेशात खालील बंधने घातली आहेत,
दि २७मे ते २९ मे रोजी 24.00 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी पार्टी नंबर 1 व पार्टी नंबर 2 यांना देवस्थानचा वार्षिक उत्सव कार्यक्रम साजरा करणेस बंदी करण्यात येत असून त्यांना किंवा त्यांच्या वतीने अन्य कुणीही उत्सव साजरा करण्यास मनाई करणेत येत आहे. . सदर ठिकाणी बंदोबस्तासाठी असणा-या पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा भंग होईल अशा त-हेचे कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.सदर आदेशातून बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी व तत्सम अधिकारी यांना वगळण्यात
आले आहे.शस्त्र परवानाधारकांनी त्यांची शस्त्र बरोबर घेऊन फिरणेसाठी मनाई करण्यात येत आहे.शस्त्रे, सोटे, तलवार, भाले, दाडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही वस्तू बाळगणेस मनाई करण्यात येत आहे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे किंवा बरोबर घेऊन फिरणेस मनाई करणेत येत आहे.पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तीनी जमाव करणे किंवा मिरवणूक काढणे किंवा रास्ता रोको
करणेस मनाई करणेत येत आहे. 8. सदरील देवस्थानचा वार्षिक उत्सव कार्यक्रमास कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी पार्टी नंबर 1 व पार्टी नंबर 2 यांचेवर निश्चित करण्यात येत आहे.वरील आदेशाचे जो कोणी उल्लंघन करेल तो भारतीय दंड संहिता कलम 188 च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरेल.
हा आदेश दिनांक 26/05/2023 रोजी माझे स्वाक्षरीने व कोर्टाच्या शिक्यानिशी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!