कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी न्यायालयाच्या समोरील संरक्षक भिंतीचे काम हाती घ्यायचे असल्याने मोती तलाव आटवले

सावंतवाडी न्यायालयाच्या समोरील संरक्षक भिंतीचे काम हाती घ्यायचे असल्याने मोती तलाव आटवले

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन

अंगाची लाही लाही होत असताना संध्याकाळच्या वेळी तलावा काठी बसून गार वारा घेणाऱे शहर वासिय नाराज..

सुंदरवाडी चे नाक असलेले मोती तलाव पूर्णपणे आठवण्यात आले असून न्यायालयाच्या बाजूने असलेला संरक्षण कठडा पूर्ण पणे खचला होता त्याचे पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सदरचा संरक्षक कठडा भिंत दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी सबनिसवाडा भागातील रहिवाशांनी मागणी होती मात्र सावंतवाडी संस्थांन व शासनाचा वाद सुरू असल्याने हे काम रखडले होते, अखेर आता या कामाला मुहूर्त मिळाला असून हे काम लवकरच हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
पावसाळ्याच्या अगोदर सदरचे काम पूर्ण व्हावे अशा दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन केले आहे, त्यासाठी सावंतवाडीचे नाक असलेले मुख्य मोती तलावातील पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे तलावाच्या काठी बसून संध्याकाळच्या वेळी गार गार वाऱ्याचा आस्वाद घेणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी वासियांना काही दिवस मुकावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!