उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे रेल्वे प्रशासनाशी चर्चा
उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे रेल्वे प्रशासनाशी चर्चा
कणकवली : कोकण रेल्वे तिकीट आरक्षण घोटाळा, दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना होणारा त्रास थांबवणे, आगामी गणेशोत्सवासाठी या मार्गावर जादा गाड्या सोडण्याच्या मागणीसह कोकण रेल्वे मार्गावरील नांदगाव रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला पुन्हा थांबा मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते, कोल्हापूर – सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणवासीय शिष्टमंडळाने कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
नांदगाव स्थानकावर सुरुवातीपासून थांबणारी गाडी दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस कोरोनात बंद करण्यात आली होती. तिला अद्याप थांबा दिलेला नाही. याबाबत खासदार राऊत यांच्या माध्यमातून मागणी केली असता गुप्ता यांनी नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली अशी, माहिती सिद्धेश राणे यांनी दिली.
