🟥 मे महिन्याच्या शेवटी तलावातील गाळ काढण्याची मोहीम म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार..
🟥 तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची खाते निहाय चौकशी व्हावी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी,दि-२७:- नगरपालिका प्रशासनाने मोती तलावाचा गाळा काढण्याचे काम हाती घेतले आहे, याचा शुभारंभ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला ,गेले तीन महिने गाळ काढण्याच्या नावाखाली व संरक्षक कठडा बांधत असल्यामुळे हा तलाव पूर्णपणे आठवण्यात आला होता, त्याचा फटका लगतच्या परिसरातील रहिवाशांना बसला असून त्यांच्या विहिरी आटल्यामुळे टँकरने पाणी घेण्याची वेळ खासकीलवाडा, सालई वाडा,सबनिसवाडा परिसरातील लोकांवर आली आहे.
नगरपालिका प्रशासनाचे हे काम म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे, पावसाळा लांबवला तर पाण्या वाचून रहिवाशांचे हाल होतील? याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे व मे महिन्याच्या शेवटाला ही मोहीम हाती घेतली आहे ती किती यशस्वी होईल याबाबत साशंकता आहे.
गेल्या वर्षी सावंतवाडीचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी मोती तलावाचा गाळा कढण्याचे काम हाती घेतले होते, हा गाळ काढत असताना संरक्षक कठड्याचा पाया खालून गाळ काढण्यात आल्याने हा संरक्षक संस्थाकालीन कठडा कोसळणार अशी भाकिते वर्तविण्यात आली होती व ती भाकीते पावसाळा आल्यावर खरी ठरली होती ,सांगायची गोष्ट म्हणजे इसाब नितील गोष्टी प्रमाणे ज्या फांदीवर शेख चिल्ली बसतो तीच फांदी तोडतो नंतर खाली पडून जखमी झालो म्हणून उपचार करायचे असा प्रकार नगरपालिका प्रशासनाने केल्याने शासनाचे दीड कोटी रुपये यावर खर्च पडले होते, हे दीड कोटी रुपये त्यावेळचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या पगारातून वसूल करण्यात यावे अशी मागणी आम्ही केली होती.
त्यानंतर सुमारे तीन महिने तो तलाव तसाच कोरडा राहिल्याने परिसरातील विहिरी आटल्या आहेत,आज पर्यंत कधीही न आटलेल्या विहीरी नगरपालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आटल्या आहेत,शहरातील नागरिकांची पावसाळा लांबवला तर पाण्या शिवाय हाल होण्याचा भीतीने गाळण उडाली आहे, दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गाळ काढण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आले,मात्र शुभारंभ झाल्यानंतर दोन दिवस गाळ काढणारी सामग्री तवीच पडून आहे, अद्यापही गाळ काढण्याचे काम सुरू झाले नाही,जर मध्ये पाऊस पडला तर तलावात उतरलेली मशिनरी पूर्ण पावसाळा भर तलावात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही ,प्रशासनाचे हे धोरण म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे, आणि मोती तलावातील गाळ काढून नागरिकांचे पाण्या वाचून जर हाल होत असतील तर गाळ काढण्याचा फायदा नेहका कोणासाठी हा ही मोठा एक प्रश्न आहे, भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता घेतलेल्या अशा निर्णयामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नूतन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी याबाबत वस्तुस्थिती निष्ठअहवाल तयार करून कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे, तत्कालीन मुख्याधिकारी जयवंत जावडेकर यांचा कारभार संशायाच्या फेऱ्यात असल्याने त्याची खात्रीने चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

