🟥 बेकायदा फलकप्रकरणी मुजीब शेख निर्दोष
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२६:* सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथे सावंतवाडी नगरपरिषदेची कायदेशीर पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या जाहिरातीचे दोन बोर्ड लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याच्या गुन्ह्यातून मुजीब शेख (रा. सावंतवाडी) याची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयितातर्फे अॅड. बाळाजी रणशूर यांनी काम पाहिले.
मुजीब शेख याचे सावंतवाडी शहरातील गांधी चौक येथील वसंत प्लाझा इमारतीत तळमजल्यावर दोन दुकान गाळे आहेत. १४ डिसेंबर २०१६ पासून ते १२ एप्रिल २०१७ या कालावधीत सदर इमारतीच्या मोकळ्या जागेत मुजीब व्हीडिओ गेम पार्लर व प्रायव्हेट गाड्या भाड्याने मिळतील, असे दोन मोठे जाहिरातीचे फलक सावंतवाडी नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीरपण लावले होते. अशा प्रकारचे बेकायदेशीर बोर्ड लावून शहराचे विद्रुपीकरण केले, अशी तक्रार नगरपरिषदेतर्फे पर्यवेक्षक आनंद कदम यांनी २९ एप्रिल २०१७ रोजी शेख याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने तपासकाम करून पोलिसांनी शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र मालमत्तेचा विरुपणास प्रतिबंध कायदा १९९५ चे कलम ३ प्रमाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरची केस सावंतवाडी न्यायालयात चालली. संशयित शेख याच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्यास सरकार पक्षातर्फे फिर्यादी कदम, तत्कालीन मुख्याधिकारी द्वासे, अतुल नाखरे, तपासी अंमलदार सुभाष तेली यांच्यासह एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. अॅड. रणशूर यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्या. आर. आर. बेडगकर यांनी मुजीब शेख याची निर्दोष मुक्तता केली
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

