कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 दामदुप्पटच्या आमिषाने युवकाला ७६ हजारांना गंडा..

🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून सावंतवाडी – माजगांव येथील एक तरुण दामदुप्पट रकमेच्या आशेने फसला. ५०० रुपयात तब्बल २० हजार रुपये देतो, असे सांगून एका ऑनलाईन कंपनीच्या नावे अज्ञाताने माजगाव येथील इलेक्ट्रिशियनला तब्बल ७६ हजार ४१७ रुपयांना गंडा घातला.

माजगाव—हरसावंतवाडा येथील भूषण सखाराम दळवी (२३) यांनी याबाबतची तक्रार पोलिसात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेल्या भूषण यांना त्यांच्या इन्स्टाग्राम अकौंटवर एका कंपनीच्या नावे रिक्वेस्ट आली. यात तुम्ही पाचशे रुपये आमच्याकडे जमा केले तर तुम्हाला २० हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला ५०० रुपये पाठविले. त्यानंतर तुम्हाला आणखी पैसे मिळणार आहेत, असे सांगून समोरून आणखी रकमेची मागणी केली. त्यानुसार दळवी यांनी पाच-पाच हजार रुपये असे करत वेगवेगळ्या अकौंटवरून तब्बल ३० हजाराहून अधिक रक्कम पाठविली.

 

त्यानंतर तुम्हाला मिळणारे पैसे हे विदेशी चलनात आहेत. त्यामुळे ते भारतीय चलनात करण्यासाठी ४० हजार रुपये पाठवा, असा संदेश आला. त्यानुसार दळवी यांनी पुन्हा त्यांना ४० हजार रुपये पाठविले. मात्र, नंतरही समोरून पैशाची मागणी होतच राहिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची दळवी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गंडा घालणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!