कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 एकाच वेळी तब्बल 453 पेक्षा प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात

🟥 जिल्ह्यातील बेरोजगार आणि स्थानिकांनाच सामावून घ्यावे ; दादा साईल*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२१:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील सुमारे 450 अधिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील तब्बल 30 टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत.. त्याचवेळी इतर जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या फक्त 11 एवढीच आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात 70 टक्के शिक्षकांवर शिक्षण विभागाची धुरा असणार आहे.. माजी मुख्यमंत्री नारायण राणे पालकमंत्री असताना त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि त्यांनी शिक्षण विभागात केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शिक्षण क्रांती’ झाली आणि जिल्ह्यात सर्व प्रकारच्या शिक्षण, तंत्रशिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाची कवाडे विद्यार्थ्यांना उघडी झाली आणि संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शैक्षणिक पॅटर्न ‘100% निकालाचा पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झाला.सध्याचे कार्यतत्पर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सुद्धा मुलांना उच्च दर्जाचे प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाबरोबरच उच्चशिक्षण मिळावे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी ई शिक्षणाचा(online tuition) पर्याय देखील उपलब्ध केला आहे.. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची मुदत संपल्याने व नवीन निवडणुका न झाल्याने जिल्हा परिषदेचा कारभार सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हातात आहे. परंतु प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या कशाशीच देणे घेणे नसल्याने त्यांनी शिक्षक बदलीच्या वेळी फक्त बघायची भूमिका घेतली आणि एकाच वेळी जिल्ह्यातील तब्बल 453 हुन अधिक शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे आता 70 टक्के शिक्षकांवर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाचा बोजा असणार आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या दर्जाचे प्राथमिक शिक्षण मिळेल?? असा प्रश्न सर्वसामान्य पालकांना पडला आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सुमारे 3973 शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी आत्ता 453 एवढे शिक्षक जिल्हा बदलीने गेल्याने रिक्त झालेल्या पदांची संख्या 1118 पर्यंत पोहचली आहे. मुळातच श्रावण मास आणि त्यात अधिक महिना अशी शिक्षण विभागाची अवस्था सध्या झाली आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी हेच आहेत..

त्याचबरोबर शिक्षक भरती किंवा कोणत्याही शासकीय नोकर भरतीच्या वेळी पर जिल्ह्यातील बरेच उमेदवार येऊन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भरती होतात. आणि नोकरीच्या काही कालावधीनंतर जिल्हा बदली घेऊन आपल्या स्वगृही जाण्याचा मार्ग अवलंबतात. आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा त्रास भोगाव लागतो. त्यामुळे यानंतर कोणत्याही विभागात सरकारी नोकर भरती होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नागरिक आणि स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. पर जिल्ह्यातील उमेदवारांना जिल्ह्यामध्ये सरकारी नोकरीत भरती होताना आम्हाला देखील. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल याची नोंद संबंधितांनी घ्यावी असे देखील त्यांनी बोलताना सांगितले आहे.

 

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!