कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवलीत भाजप शहर संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन.!

*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२०:-* नगरपंचायत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून कणकवली शहर भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी १०:३० वाजता आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली कंझ्युमर्स सोसायटी समोर नगरपंचायत रोडलगत भाजप कार्यालय सुरू करण्यात आले असून, कणकवली नगरपंचायतवर प्रशासक आल्यानंतर लोकनियुक्त नगरसेवक निवडीपर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग केला जाणार असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

 

यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, कणकवली नगरपंचायत क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि शहराचे सर्वच लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्र मिळून शहरामध्ये आदर्श जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श घालून दिला आहे. दाखल्यापासून ते मोठ्या प्रकल्पांपर्यंत छोटी – मोठी काम आपल्या शहरात सुरू केली. कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका लागेपर्यंत सत्ता असो किंवा नसो लोकांची सेवा आम्ही करत राहू. या दृष्टिकोनातून टाकलेलं हे अतिशय महत्त्वाचं आणि समाधानकारक पाऊल आहे. त्यामुळे सतत आम्ही जनतेच्या संपर्कात राहू, जनतेच्या कुठच्याही अडीअडचणी असतील ते त्या सोडवण्यासाठी वर्षनु – वर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन लोकांची सेवा करत आहेत.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, आता आम्हाला सेवा करण्यासाठी एक पत्ता मिळालेला आहे आणि त्या पत्त्यावर आल्यानंतर कोणीही खाली हात जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असही आमदार नितेश राणे उद्घाटन प्रसंगी म्हणाले.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक ॲड. विराज भोसले, रवींद्र गायकवाड, शिशिर परुळेकर, अभिजित मुसळे, कविता राणे, मेघा गांगण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, गणेश तळगावकर, बंडू गांगण, अभय राणे, महेश सावंत, किशोर राणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, संदीप मेस्त्री, चारुदत्त साटम, सुशील पारकर, राजश्री धुमाळे, संजना सदडेकर, शहराध्यक्षा प्राची कर्पे, साक्षी वाळके, सागर राणे, शिवसुंदर देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!