नगराध्यक्ष संजू परब यांनी घेतलेले निर्णय जनहिताचेच; भाजप मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे
▪️विरोधकांची खाऊ गल्ली बंद झाल्यामुळे ढोल-ताशांचा तमाशा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२८: शहरातील अनधिकृत स्टॉल संबंधी नगराध्यक्ष साहेबानी घेतलेल्या भूमिकेचे भाजपा सावंतवाडीचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते समर्थन करतात. आम्ही संपूर्ण भाजप नगराध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.असे निवेदन भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी तो अनधिकृत स्टॉल नगरपालिकेची कार्यवाही झाल्यानंतरही त्या अनधिकृत स्टॉलच्या समर्थनार्थ जावून सदरचा अनधिकृत स्टॉल पुन्हा उभा केल्याबद्दल आम्ही सावंतवाडी भाजपातर्फे निषेध व्यक्त करतो.गेली २५ वर्षे अशाच प्रकारची अनधिकृत गाळे उभे करुन ज्या नगरसेवकांनी त्यात पैसे मिळवले. तेच नगरसेवक आता त्यांची रोजी रोटी बंद झाल्यामुळे त्यांचा जळफळाट झाला आहे. तो त्यांनी नगरपरिषदेच्या आवारात ढोल वाजवून व्यक्त केला आहे. काही समाज विघातक घटकांना बरोबर घेवून अशा प्रकारचे शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकारी निव्वळ नौटंकी करत आहेत ही गोष्ट जनतेला माहित आहे.असा आरोप गोंदावळे यांनी केला आहे.
दिपक केसरकर नगराध्यक्ष असताना भांगले पेट्रोल पंप समोरील खाऊ गल्ली उद्धवस्त करुन स्थानिक लोकांना बेरोजगार केले तेव्हा लोबो मॅडम गप्प का होते. केसरकरांच्या विरोधात त्यावेळी ढोल का बडवले नाहीत. त्यावेळेच्या बेरोजगारांना दिपकभाईनी नोकरी किंवा इतर ठिकाणी व्यवसाय करणेसाठी जागा दिली होती का. याबाबत लोबो मॅडमनी खुलासा करावा.असे आव्हान गोंदावळे यांनी दिले आहे.
नगराध्यक्षांनी जी कार्यवाही केली आहे. ती सावंतवाडीला जनतेला भाजी मार्केटमधील सुटसुटीतपणा ठेवण्यासाठी केलेली आहे. सणासाठी ४ दिवसाच्या बोलीवर परवानगी दिलेला गाळा हा नगरपालिका प्रशासनाने हटवणे हे त्यांचे काम आहे. या विरोधात शिवसेना नगरसेवक पदाधिकारी व इतर पक्षीय कार्यकर्ते त्या अनधिकृत गाळ्यांचे समर्थन करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. याचा भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही निषेध करतो.-भारतीय जनता पार्टी हा सर्व सामान्य माणसांचा पक्ष आहे. आम्ही भाजपा पार्टी समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय होऊ देणार नाही. पण जर कोण अनधिकृत काम करत असेल तर त्याला आमचा जाहीर विरोध असेल.असे गोंदावळे यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी शहरात काही स्वयं घोषित नेते जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याच प्रयत्न करुन सावंतवाडी शहराची बदनामी करण्याचा कट रचत आहेत.या स्वयंघोषित नेत्यांनी कोविड काळात काय कामे केली हे जनतेला सांगण्यापेक्षा इतर गोष्टी जनतेला दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत.कोविड काळात भाजपा नगराध्यक्ष संजू परब व इतर सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांनी प्रत्येक वार्डमध्ये केलेली कामे सावंतवाडीच्या नागरिकांना माहित आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणेसाठी महाविकास आघाडी अनधिकृत स्टॉलचा विषय घेवून जनतेची दिशाभूल करत आहेत. यांना सावंतवाडीची जनता येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवून देईल.असे गोंदावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नगराध्यक्षांनी सर्व कंत्राटदार यांना बोलवून वर्क ऑर्डर झालेली सर्व कामे व रस्त्याची कामे डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहरातील एकही रस्ता खड्डेमय राहाणार नाही. त्याचप्रमाणे काझीशहा बुद्धीन हॉल, स्विमिंग पुल, जिमखाना मैदान, शिवउधान सुशोभिकरण व जनतेच्या मागणीप्रमाणे असणारी इतर सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा निर्धार नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे.असे शहराध्यक्ष अजय गोंधावळे यांनी स्पष्ट करून संजू परब यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व ले%

