कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🟥 तरीही माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे नाराज ;स्वगृही परतणार

🟥 निळी-लाल पुररेषा रद्दचा निर्णय प्रलंबित ; नदीला संरक्षक भिंतीसाठीचा निधी प्रतीक्षेत..*

*🟥 सुचवलेल्या विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याने होतोय भ्रम निरास..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-१७:-* गेल्या काही महिन्यांपूर्वी चिपळूण शहराच्या विकासाच्या दृष्टीने येथील माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांच्यासह चार नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. आता चिपळूण शहराच्या विकासासाठी १२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी काही विकासात्मक मुद्द्यांवर माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे नाराज असल्याची चर्चा असून ते स्वगृही परतणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना उपनेते माजी आ. सदानंद चव्हाण शिंदे यांच्याशी चर्चा करीत असल्याचे समजते. यामुळे पुन्हा एकदा चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ होणार की काय? याची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालती झाल्या. यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेत शिंदे -फडणवीस सरकार आले. यानंतर शिंदे गटात ठाकरे गटातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रवेश केला. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. यामध्ये आमदार योगेश कदम, उद्योजक नासिर खोत यांच्या पुढाकाराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक करामत मिठागरी, माजी नगरसेविका संजीवनी शिगवण, ठाकरे गटाच्या नगरसेविका स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने चिपळूणच्या राजकारणात खळबळ उडाली.

 

या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना (शिंदे गट) पक्ष प्रवेशकर्ते सुधीर शिंदे यांनी आम्ही चिपळूण शहराच्या विकासासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याचे स्पष्ट केले होते. यानुसार चिपळूण शहराच्या विकासासाठी सुमारे ३६९ कोटी रुपयांची कामे सुचविण्यात आली. यामध्ये चिपळूण शहराच्या विकासाला बाधा असणारी निळी-लाल पुररेषा रद्द करण्याची प्रमुख मागणी होती. चिपळूण नगर परिषदेने चार वर्षांपूर्वी चिपळूणमधील नद्यांना मेरिटाईम बोर्डाकडून संरक्षक भिंत बांधणे, यासाठी ठराव केला होता. या ठरावासह मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली. याकरिता हजारो कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. चिपळूण शहरासाठी नळपाणी योजना राबविणे, यासारख्या मागण्या होत्या. मात्र, या विषयांना कोणतीही चालना मिळताना दिसत नाही. यामुळे जनतेला उत्तर काय द्यायचे? असा प्रश्न माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांना पडलेला दिसून येत आहे.

 

तर दुसरीकडे चिपळूण शहरातील विकासकामांसाठी केवळ १२ कोटी ६१ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तरीही माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. हा निधी मंजूर करून केवळ गाजर दाखविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यातून भ्रम निरास झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

 

माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण शहरासह ग्रामीण भागातील सुमारे २ हजार समर्थक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार होते. मात्र, शिंदे यांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी सुचवलेली विकासकामे मंजूर होणार नसतील तर शिवसेनेत प्रवेश कसा करायचा? असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे सर्वसमावेशक, उत्तम जनसंपर्क दांडगा असलेले नेतृत्व असून नगर परिषदेच्या कारकिर्दीत कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना अन्य पक्षात प्रवेश करण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!