महाराष्ट्रशैक्षणिकसांगली

🟥 विद्यार्थी रडतायेत, ‘गुरुजी तुम्ही जाऊ नका’, पालकांचे सुध्दा डोळे पाणावले

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सांगली, दि-१२:-* सांगलीच्या जत तालुक्यातील पांडोझरी-बाबरवस्ती जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांची आंतरजिल्हा बदली झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक भावूक झाल्यामुळे याची सगळीकडे चर्चा आहे. गुरुजींच्या भोवती मुलं फिरत होती, ‘गुरुजी तुम्ही जाऊ नका.’ त्याचबरोबर विनवण्या सुध्दा करीत होती. हे सगळं पाहून पालकांचे डोळे पाणावले. शिक्षकाची श्रीमंती विद्यार्थ्यांच्या प्रेमावर व मायेवर असते ते या घटनेने दिसून आलं आहे. अनेकदा शिक्षकाची बदली झाल्यानंतर अशा पद्धतीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मुलाचं शिक्षकाप्रती असलेलं प्रेम खूप काही सांगून जातं. जिल्हा परिषद मराठी शाळेचे प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे जत पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक द्विशिक्षिकी वस्ती शाळेत दिलीप वाघमारे हे जून २०११ पासून शिक्षक म्हणून काम करत होते. तेथे काम करत असताना त्यांनी सह शालेय उपक्रम, – पालक भेटी, शैक्षणिक उठाव उपक्रम, पालक संपर्क, शैक्षणिक जागृती असे उपक्रम राबवले व विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन शैक्षणिक दर्जा चांगलाचं उंचावला. त्यांनी चांगलं काम केल्यामुळे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळाला आहे. त्यांनी मुलांना शिक्षण देत असताना अधिक जीव लावल्यामुळे मुलं रडली. वस्तीवरील ४० कुंटुंबे व्यसन मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे.

ज्ञानरचनावाद, बोलक्या भिंती, वृक्ष लागवड व संगोपन हे उपक्रम ही त्यांनी तिथं राबविले आहेत. अशा या धडपडी व उपक्रमशील दिलीप वाघमारे गुरुजी यांची नांदेडला बदली झाली. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ अतिशय भावूक झाले होते. मुलांच्या मनात गुरुजींच्या बद्दल आदर प्रेम भावना असल्याने निरोपावेळी सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!