कोकणक्राइममहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

लोरेतील प्रौढाचा झाडावरून पडून मृत्यू

लोरेतील प्रौढाचा झाडावरून पडून मृत्यू

वैभववाडी

लोरे नंबर २ गावठाणवाडी येथील विजय तुकाराम गोरुले (५५) यांचा झाडावरून पडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी आठ वा. ही घटना घडली. याबाबत लोरेचे माजी सरपंच महेंद्र बाळकृष्ण रावराणे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.

विजय गोरुले हे सकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या शेतात रतांबा काढण्यासाठी गेले होते. रतांबा काढत असताना झाडावरून ते खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी नऊ वा. त्यांची भावजय त्यांच्यासाठी भाकरी व पाणी घेऊन गेली असता ते रतांब्याच्याझाडाखाली निपचित पडले असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यांना हाका मारून उठविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. यावेळी तिने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलवून घेतले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक देसाई, हेड कॉन्स्टेबल शैलेश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. विजय गोरुले हे नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास होते. मात्र, शेतीची आवड असल्याने एक वर्षांपूर्वी ते मूळ गावी लोरे नंबर दोन गावठाणवाडी इथेच स्थायिक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!