सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांची तडकाफडकी बदली झाल्याचे वृत्त..
▪️जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांना त्रास देण्याचे प्रकरण भोवल्याची चर्चा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२६: सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्रीमंत चव्हाण यांनी डॉक्टर संजय निगुडकर यांच्या हॉस्पिटल ला दिलेली भेट व केलेली तपासणी वादग्रस्त ठरली. या भेटीवर व तपासणीवर अनेक मते मतांतरे व्यक्त करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून सिव्हील सर्जन श्रीमंत चव्हाण यांनी ही तपासणी केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला दिले होते. ते आश्वासन पाळतात जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण यांची बदली केल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही, याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता मी जे कामकाज केले ते नियमात केले नियमाच्या बाहेर जाऊन कुठेही काही केले नाही, त्या कामकाजामुळे काही जण नाराज होऊ शकतात, त्या नाराजीतून बदलीचा प्रयत्न झाला असेल व तसा प्रयत्नही सुरू होता असे माझ्या निदर्शनास आले होते मात्र अद्याप पर्यंत आपल्याला बदलीचे आदेश प्राप्त झाले नाहीत असे स्पष्ट केले.
दोन महिन्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात चे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झालेले डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची बदली झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या आरोग्य वर्तुळात सुरू आहे. यापूर्वीचे शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची नियुक्ती झाली होती.
सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची ही डॉक्टर चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर डॉक्टर चव्हाण यांच्या बाबतीत काय निर्णय होणार याकडे लक्ष असतानाच अचानक त्यांच्या बदली चे वृत्त जिल्ह्याच्या आरोग्य विभागात चर्चिले जाऊ लागले आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

