कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार दिनानिमित्त कामगार व कर्मचारी यांचा संयुक्त मेळावा

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२८* १ मे हा जसा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, तसाच तो जागतिक कामगार दिन म्हणूनही जगभर साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २०१० सालापासून विविध कामगार व कर्मचारी संघटनातर्फे कामगार दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक १ मे २०२३ रोजी कणकवली शहरांमध्ये कर्मचारी / कामगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. देशातील सर्वच कामगार / कर्मचारी चळवळी समोरील विविध आव्हाने लक्षात घेऊन विविध कामगार / कर्मचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संघटीत होण्याची गरज आहे.

गेल्याच महिन्यात महाराष्ट्र राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी, अधिकारी नेमणुकीचे आदेश काढला आहे. तर नुकताच तामिळनाडू सरकारने ८ तासाऐवजी १० तासांचा कामाचा दिवस जाहीर केला आहे. केंद्र सरकारने तर गेल्याच वर्षी तीन नवीन कामगार संहिता लागू करून कामगार / कर्मचारी संघटना यांचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. देशभरातील केंद्र व राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी गेली १० वर्षे जुन्या पेन्शन योजनेसाठी प्राणपणाने लढत आहेत. गेल्याच महिन्यात महाराष्ट्र शासनाविरोधात जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून बेमुदत संप पुकारला होता. एक आठवड्यानंतर राज्य सरकारने काही ठोस आश्वासन दिल्यावर तो संप मागे घेण्यात आला. तसेच गेल्या वर्षी एस टी कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाच्या विरोधात ६ महिने संप केला होता. बँक कर्मचारी, विमा कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलने करून आपला रोष व्यक्त केला आहे.

थोडक्यात सर्वच कामगार, कर्मचारी हे वेतनकपात, कामाच्या कालावधीत वाढ, पेन्शन योजनेत बदल, सामाजिक सुरक्षेत घट, अशा अनेक बाजूने भरडला जात आहे.

तरी सर्व कामगार, कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह मे दिनानिमित्त आयोजित कामगार कर्मचारी मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

*वक्ते:* मा. प्रवीण शेवडे, अर्थतज्ज्ञ.

*विषय:* सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा आणि शासनाचे कामगार विषयक धोरण.

 

*विशेष उपस्थिती:* उमेश खोत, महासचिव बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन.

 

*दिनांक:* सोमवार दि. १ मे २०२३.

*वेळ:* सायं. ४.०० वाजता.

(कार्यक्रम बरोबर ४.३० वाजता सुरू होईल.)

 

*स्थळ:* हॉटेल अप्पर डेक सभागृह, स्टेट बँकेच्या समोर, कणकवली.

 

आपले सहकारी,

निमंत्रक

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्ग

*(KKSSKS)*

 

( *सूचना:* मेळावा संपल्यानंतर लगेचच त्याच ठिकाणी जुनी पेन्शन योजना व शासकीय धोरणे याबाबत महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंतांचे अभ्यासपूर्ण चर्चासत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्याबाबत सहविचार बैठक घेण्यात येणार आहे, तरी सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी कृपया उपस्थित रहावे, ही विनंती.)

 

संपर्क:

संतोष रानडे: 9422392638

 

विनोद पाटील: 9421235804

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!