कोकणक्राइमपुणेमहाराष्ट्र

🟥 पुणे शहरात २ पिस्तुलांसह एकाला युनिट २ने घेतले ताब्यात..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴पुणे, दि-२८:-* पुणे शहरातील सराईत गुन्हेगाराकडून २ अग्निशस्त्र काडतुसासंह हस्तगत करण्यात युनिट २ला यश आले आहे. युनिट २चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात बेकायदेशीर पिस्तूल व गावठी कटटे बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने युनिट २ प्रभारी अधिकारी क्रांतीकुमार पाटील , पोउपनिरी नितीन कांबळे व युनिट-२ कडील पोलिस अमंलदार यांचे पथक तयार केले आहे. पथकातील पोउपनि नितीन कांबळे, पो हवा. ५७८५ शंकर नेवसे, पो ना ७५१४ गणेश थोरात, मपोहवा ५९६३ साधना ताम्हाणे, पो अ. ८४०९ समीर पटेल, १०७४३ कादिर शेख, पो अ.८८३४ पुष्पेद्र चव्हाण असे युनिट २

हददीत २६/४/२०२३ रोजी गुन्हे प्रतिबधंक गस्त करीत होते. पो अ,१०७४३ कादिर शेख व पो अ ८४०९ समीर पटेल यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे नमुद पथकाने युनिट-२ प्रभारी अधिकारी क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फकरीहिल सोसायटीचे बाजूस गल्लीमध्ये कोंढवा खुर्द पुणे येथून इमरान शफी शेख (वय ३८ वर्ष रा. आशोका सुमित सोसायटी मिठानगर कोंढवा खुर्द पुणे) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे ७४,४००/- रु.१ पिस्टल, १ गावठी कटटा व २ जिवंत काडतुसे मिळून आल्याने पंचनाम्याने जप्त केलेली आहे. त्याचे विरुध्द कोंढवा पोलिस स्टेशन गु.र.नं.४३५/२०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महा. पोलिस अधि. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैदयकिय तपासणी करुन त्यांस कोंढवा पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस स्टेशन येथे चालू आहे. सदर आरोपी अभिलेखावरील आरोपी असून त्याचेवर येरवडा पोलिस स्टेशन येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!