आणखीकुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥माणगाव : मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ,दि.२७* माणगाव तळीवाडी येथील अमित सखाराम कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच चौघांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित कदम यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आपणास माणगाव-तळीवाडी येथील सचिन धुरी याने, मुळा येथे खाली ये, असे सांगितले. आपण त्याठिकाणी गेल्यावर तेथे सचिन थुरी, नागेश सावंत, राजू मगे, विनोद मिसे (सर्व रा. माणगाव-तळीवाडी) हे होते. यावेळी यातील नागेश सावंत याने लाकडी दांड्याने आपल्या कानाच्यावर मारले. याचवेळी राजू मगे, विनोद मिसे यांनी तोंडात, पाठिवर ठोशाने मारले. सचिन धुरी यानेही आपणास मारहाण केली. त्यानंतर आपण घाबरून आपल्या घरी गेलो. २३ एप्रिल रोजी आपण व सचिन धुरी याच्यामध्ये बाचाबाची झाली होती. सचिन धुरी याने ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे काम घेतले आहे. त्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने खोदल्याने त्याची माती रस्त्यावर आली होती. ती माती काढण्यासाठी सचिन धुरी याला अमित कदम यांनी सांगितले होते. २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता त्यांचा डंपर या मातीमध्ये रुतून बसला होता. यावेळी आपण खोदाई करून ठेवलेली माती का काढली नाही?, याची विचारणा कामाचा ठेका घेतलेल्या सचिन धुरी यांना केली होती. या विषयावरून दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली होती, अशी फिर्याद अमित कदम यांनी कुडाळ पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी नागेश मधुकर सावंत, राजू रत्नाकर भगे, विनोद मोहन भिसे व सचिन सदाशिव धुरी (सर्व रा. माणगाव-तळीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!