🟥 आठ महिन्यांत सहा लाख ज्येष्ठांनी केला प्रवास
*🟥 एसटीची अमृत योजना: ‘महिला सन्मान’लाही प्रतिसाद*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.२६* सिंधुदुर्ग विभागात अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल ५ लाख ८६ हजार ५७२ ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घेत एसटीतून मोफत प्रवास केला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेला २६ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून गेल्या ८ महिन्यांत ७५ वर्षे वयोगटावरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेद्वारे ५ लाख ८६ हजार ५७२ ज्येष्ठांनी एसटी बसमधून मोफत प्रवास करून सुरक्षित प्रवास म्हणून एसटीला पसंती दिल्याचे दिसून येते. ऑगस्टमध्ये २ हजार ११८, सप्टेंबरमध्ये ५४ हजार ५१७, ऑक्टोबरमध्ये ७६ हजार ९७१, नोव्हेंबरमध्ये८७ हजार ८८२, डिसेंबरमध्ये ९०हजार ४८२, जानेवारीमध्ये १ लाख ३ हजार ७२७ फेब्रुवारीमध्ये ५२ हजार १७३, मार्चमध्ये १ लाख १८ हजार ७०२ एवढ्या जणांनी मोफत प्रवास केला आहे.
*’महिला सन्मान’ला मिळतोय प्रतिसाद*
एसटीच्या प्रवास भाड्यात महिलांना सरसकट ५० टक्के सूट देण्यासाठी राज्य सरकारकडून महिला सन्मान योजना सुरु करण्यात आली. या योजनेला सिंधुदुर्गातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २० एप्रिलपर्यंत तब्बल १३ लाख ७ हजार २६९ जणींनी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे एसटीच्या महिला प्रवासी संख्येतही वाढ होताना दिसत आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

