कोकणक्राइमदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 तोरसोळे येथे टेम्पो अडवून दोघांना मारहाण..

 

*🟥 पाच संशयितांविरुद्ध गुन्हा ; जमीन वादातून घटना*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-२४:-* तोरसोळे-धनगरवाडी येथे पाणी आणण्यासाठी जाणारा टेम्पो अडवून टेम्पोतील दीपक विठ्ठल वरक व आयेशा अनिल वरक यांना टेम्पोतून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तेथील गंगाराम धाकू वरक याच्यासह पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये दोन महिलांचाही समावेश असून जमीन जागेच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती देवगड पोलिसांनी दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरसोळे धनगरवाडी येथील दीपक वरक व गंगाराम धाकू वरक या कुटुंबियांमध्ये घर व जमीन जागेवरून

 

वाद आहेत. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, दीपक वरक यांच्या चुलत बहिणीकडे कार्यक्रम होता.. या कार्यक्रमासाठी लागणारे पाणी आणण्यासाठी २१ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वा. च्या सुमारास दीपक वरक हे टेम्पो घेऊन निघाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत आयेशा अनिल वरक टेम्पोमध्ये होत्या. यावेळी तेथील गंगाराम वरक, गीता गंगाराम वरक, मंगेश सीताराम वरक, मनाली मंगेश वरक व सीताराम वरक या संशयितांनी दीपक वरक यांचा टेम्पो अडविला. टेम्पोतून दीपक वरक व आयेशा वरक या दोघांना खाली ओढून त्यांना मारहाण केली. याबाबतची तक्रार दीपक वरक यांनी पोलीस स्थानकात दिली आहे., तक्रारीनुसार पोलिसांनी गंगाराम वरक याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!