कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 झाराप येथे कार-दुचाकी धडकेत दोघे जखमी..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२२:-* मुंबई-गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे ईर्टिका कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास झाला. कार व मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी मोटारसायकलस्वार बिलाल नजीर शेख (२३, रा. झाराप कामळेवीर मुस्लिमवाडी) याच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद ईर्टिका कार चालक पांडुरंग सुरेश गुरव (रा. शिरवल, ता. कणकवली) यांनी पोलिसांत दिली. या. फिर्यादीनुसार, पांडुरंग सुरेश गुरव व सदाशिव सावंत (रा. मळगाव ता. सावंतवाडी) हे ईर्टिका कारमधून सकाळी ८.३० वाजता कणकवली येथून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. महामार्गावर झाराप तिठा
येथे सकाळी ९.३० च्या सुमारास सावंतवाडीहून माणगावच्या दिशेने जात असताना बिलाल नजीर शेखने आपली मोटारसायकल अचानक वळविली आणि त्याने ईर्टिका कारला दुभाजकाच्या बाजूने धडक दिली. यात कारसह मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले. अपघातात मोटरसायकलस्वार बिलाल नजीर शेख व मागे बसलेला मास शरिफ शेख (१५, रा. झाराप मुस्लिमवाडी) हे दोघे जखमी झाले. ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून जखमींना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.
यात दोन्ही वाहनांच्या नुकसानीसं तसेच पाठिमागे बसलेल्या मुलाच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बिलाल शेखवर कुडाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!