🟥 वेंगुर्ले नगर परिषद शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत अव्वल..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२०:-* महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण २०२३ या स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्वच्छतेमध्ये या नगरपरिषदेने राज्यात आपला डंका कायम ठेवला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत १५ कोटींचा धनादेश व प्रमाणपत्र देत शासनाने वेंगुर्ला नगरपरिषदेचा सन्मान केला.
मुंबई येथे झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे हा १५ कोटींचा धनादेश व प्राणपत्र देत वेंगुर्ला नगरपरिषदेचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे उपस्थित होते. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी काही महिन्यांपूर्वीच नगरपरिषदेचा कारभार स्वीकारला. सद्या नगरपरिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवक असे लोकप्रतिनिधी नसून प्रशासकीय कारभार सुरू आहे. असे असताना सुद्धा मुख्याधिकारी श्री. कंकाळ यांनी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना बरोबर घेऊन यशस्वीपणे शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत भाग घेत आपल्या उत्कृष्ट कामाचे प्रदर्शन दाखवून दिले. शहरातील स्वछतेचा दर्जा कायम ठेवत संपूर्ण शहरातील भिंतींवर सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व वेंगुर्ला शहराची संस्कृती सांगणारी भित्तीचित्रे काढुन शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि याचेच फलित म्हणून या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषद अव्वल ठरली व वेंगुर्ला शहराचा डंका कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

