🟥 मुंबईत कार चालकाचं ट्रॅफिक पोलिसासोबत भयानक कृत्य ; 20 किमी नेलं फरफटत..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-१६:-* नवी मुंबईत एका कार चालकाने ट्राफिक पोलिसाला जवळपास २० किमी पर्यंत बोनेटवरून फरफटत नेलं. सुदैवाने यात ट्राफिक पोलिसाला कोणती दुखापत झाली नाही.पोलिसांनी आरोपी कार चालकाला अठक केलीय. तरुण सिग्नल तोडून जात असताना ट्राफिक पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणाने गाडी थांबवली नाही. तेव्हा ट्राफिक पोलिस कारच्या बोनेटवर आदळला.
याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्राफिक पोलिस कारच्या बोनेटवर कसाबसा स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. त्याचं नाव आदित्य बेमडे असं असून तो नेरुळमध्ये राहतो. पोलिसांनी सांगितलं की तो नशेत गाडी चालवत होता.
ट्राफिक पोलीस सिद्धेश्वर माळी हे कारच्या बोनेटवर अडकल्याने थोडक्यात वाचले. जवळपास २० किमी अंतर ते जीव मुठीत धरून कारच्या बोनेटवर होते. पाम बीच रोडवर असणाऱ्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. ट्राफिक पोलिस सिद्धेश्वर माळी ब्लू डायमंड जंक्शनवर रेड सिग्नल तोडणाऱ्या आणि स्कूटरला धडक देणाऱ्या कारला रोखण्याचा प्रयत्न करत होते.तेव्हा कार चालकाने गाडीचा वेग वाढवला.वाहन चालकाला थांबवताना वाहतूक विभागाकडून ब्लू डायमंडजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. सर्व वाहने थांबवून तपासणी करून पुढे पाठविण्यात येत होती. यावेळी वाहतूक कर्मचार्याने एका कार चालकाला थांबवण्यास जाताच त्यांनी गाडीचा वेग वाढवला.
त्याला पकडण्यासाठी वाहतूक पोलीस गाडीच्या समोर गेला तेव्हा वाहतूक कर्मचारी त्याच्या बोनेटवर चढले. पोलिस कर्मचाऱ्याला बोनेटवर बसलेले पाहून कार चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि त्याला ओढत गव्हाण फाट्यापर्यंत गेला. वाशी ब्लू डायमंडपासून हे अंतर सुमारे 20 किलोमीटर इतकं आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, कार चालकाने त्याला बोनेटवर बसवले आणि पुढे गेल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर वाहतूक विभागाच्या पथकाने त्याचा पाठलाग करून गव्हाणजवळ कारसमोर टँकर उभे केले.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

