शेर्ले – कास रस्त्यावर जीवघेणे खड्डे….
येत्या 19 एप्रिल पर्यंत कामाचा प्रारंभ आदेश न झाल्यास कास ग्रामस्थांसह उपोषण छेडणार असल्याचा सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला इशारा.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
शेर्ले-कास रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरी करिता पाठविला असून गेले वीस दिवस प्रलंबित आहे.येत्या 19 एप्रिल पर्यंत कामाचा प्रारंभ आदेश न झाल्यास सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.
पावसाळ्यापूर्वी कास-शेर्ले खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.मात्र यावर कोणतेही कार्यवाही झाली नाही.संबंधित कार्यालयाशी वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिकांना पावसाळ्यात अपघातांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.तारीख 19 एप्रिल पूर्वी कामाचा प्रारंभ आदेश प्राप्त न झाल्यास 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर कास गावातील नागरिकांसह बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला.तसेच यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही पत्रात नमूद केले आहे.