आपल्या सहकाऱ्यांना फसवणे हीच केसरकरांची संस्कृती -संजू परब
आपल्या सहकाऱ्यांना फसवणे हीच केसरकरांची संस्कृती -संजू परब
पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्याला भरघोस निधी,याचे भान ठेवा.
सावंतवाडी दि१२ :शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची आपल्या सहकाऱ्यांना फसवणे ही संस्कृती आहे,त्यांनी दिलीप नार्वेकर, प्रविण भोसले,शरद पवार,नारायण राणे या यांना फसवले तसे आम्ही कोणाला फसवले नाही, जिल्ह्यातील बेरोजगारांनी त्यांना टाम टूम मंत्री अशी उपमा दिली आहे अशी टीका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
राजन तेली हे सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विकासकामांसाठी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे वक्तव्य करण्यापूर्वी याच भान केसरकर समर्थक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे व जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी ठेवावं. फुकटची वायफळ बडबड करू नये, कुणाला तिकीट द्यायच हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे, केसरकर १३ वर्षात कुणाला नोकरी देऊ शकले नाही. घोषणाबाज टामटूम शिक्षणमंत्री ते आहेत असा टोला भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी हाणला.
नगरपरिषद डोळ्यासमोर ठेवून केसरकर राजकारण करत आहेत. हे विकास करू शकत नाही. त्यामुळे पोकळे, दळवींनी आदी केसरकरांना आवरावे नंतर आमच्या नेत्यांवर बोलावं.असा सल्ला संजू यांनी दिला आहे.

