कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

शहरातील पाण्याच्या प्रश्नाबरोबर संपूर्ण व्यवस्था कोलमडली ; तात्काळ उपाययोजना करा

*🟥 शहरातील पाण्याच्या प्रश्नाबरोबर संपूर्ण व्यवस्था कोलमडली ; तात्काळ उपाययोजना करा*

*🟥 माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सावंतवाडी चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या कडे मागणी..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी शहरातील पाण्याच्या प्रश्नाबरोबर एकंदरीत संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून त्यावर प्रशासनाचा अंकुश नाही, प्रशासनातील काही कर्मचारी अरेरावी पद्धतीने वागत आहेत,शहराला गलिच्छ रूप प्राप्त होत आहे,याकडे मुख्याधिकारी म्हणून आपण जातीनिशी लक्ष घालून त्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी चे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे ,पाण्याच्या तक्रारीनंतर नगरपरिषद कर्मचारी सुरुवातीच्या टॅबमधून पडत असलेल्या पाण्याचे फोटो काढून पाणी मिळत असल्याचं आभास निर्माण करतात परंतु सत्य परिस्थिती ग्राहकाला पाचशे लिटर ही पाणी मिळत नाही , शहरातील उंच भागामध्ये पाण्याचा प्रचंड अभाव आहे ,
शहरांमध्ये ठीक ठिकाणी मच्छी विक्रेते बसत असून शहराचे विद्रोपीकरण आणि गलिच्छपणा वाढत चालला आहे ,शहरातील स्वच्छतेबाबत एकसूत्रता नसून शहरांमध्ये ठिकठिकाणी आतल्या पानंदी रस्त्यामध्ये कचरा दिसत आहे, फक्त दर्शनी भागामध्ये झाडलोट सुरू असते प्रत्येक पानंदी मध्ये स्वच्छता होणे आवश्यक आहे, शहरातील ओले गटार स्वच्छ केली जात नसून ती साफ करून तिथे पाणी मारणे आवश्यक आहे, तलावाच्या पाण्याची दुर्गंधी सगळीकडे पसरलेली आहे, तलावातील काठाच्या बाजूने असलेला कचरा काढणे आवश्यक आहे, परंतु तिथेही कोणी आज तगायत लक्ष दिले नाही सार्वजनिक शौचालय अत्यंत गरीब स्थितीमध्ये आहेत, इथे रोज स्वच्छता होणे आवश्यक आहे असे निवेदनात म्हटले आहे.
एसटी स्टँड, सुलभ शौचालय अत्यंत गलिच्छ असते याचं इन्स्पेक्शन होण आवश्यक आहे , शहरात रस्त्यावरती ठीक ठिकाणी खडी वाळू अस्तव्यस्त पडलेली असते इथेही दुर्लक्ष आहे ,कार्यालयीन कामकाजातअनियमितता असून येथे नागरिकांना साध्या साध्या दाखल्यासाठी रजिस्ट्रेशन साठी अनेक वेळा खेपा माराव्या लागतात ही बाब गंभीर आहे,स्थानिक नागरिकांना साध्या साध्या गोष्टीसाठी नगर परिषदेमध्ये पुन्हा पुन्हा ये ,-जा करावी लागते याचा अर्थ आपला प्रशासनावरती लक्ष नाही असा होतो, म्हणून आपण सर्वच खातेप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनातील अनियमित कर्मचाऱ्यातील समन्वय अभाव आपण साधून द्यावा अशी मागणी केली आहे,
काही कर्मचाऱ्यांचा अरेरावी पण आवडला असेल त्याचा नागरिकांचा त्रास होतोय अशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त आहेत,सावंतवाडी शहराची ओळख पर्यटन नगरी अशी आहे इथे अनेक टुरिस्ट या शहराला भेट द्यायला येतात प्रशासकीय काळामध्ये इथे दुर्लक्ष होत आहे वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रशासनामध्ये सुशत्रता आणावी तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरती लक्ष देऊन पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न कार्यालयीन कामकाज चा प्रश्न आपण जातीने लक्ष देऊन दूर करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!