कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*मांगेली तळेवाडी येथील श्री महागणपती मंदिराचा आठवा वर्धापनदिन सोहळा

*मांगेली तळेवाडी येथील श्री महागणपती मंदिराचा आठवा वर्धापनदिन सोहळा*

*श्री महागणपती मंदिर व श्री महापूर्वज देवस्थानचा आठवा वर्धापनदिन सोहळा मंगळवार दि.११/०४/२०२३ आणि बुधवार दि.१२/०४/२०२३ रोजी विविध कार्यक्रमानेसंपन्न होणार आहे.
सकाळी ५ वा.श्री महागणपती काकड आरती तद्नंतर श्रीचे मंगलस्नान दुपारी १२ वा.मध्यान्ह आरती संध्याकाळी ४वा. महिला मंडळाचा फुगडीचा कार्यक्रम, रात्री ८ ते ९ वा. पारंपरिक विशेष लोककला “रनमाले”सादरीकरण.
‌‌. बुधवार दि.१२ रोजी सकाळी १०वा. सत्यनारायण पुजा दु.१ ते ३ पर्यंत महाप्रसाद, रात्री ठिक ८.३०वा. कै. श्री. पांडुरंग गोविंदं गवस प्रतिष्ठान व श्री महागणपती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मान. ना.श्री दिपकभाई केसरकर साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते दशक्रोशीतील वि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांचा पुरस्कार देऊन सत्कार समारंभ. रात्री १०.३० वा. वालावलकर दशावतार नाटक मंडळ वालावल यांचा पौराणिक दणदणीत नाट्य पुष्प. आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून श्री कृपेस पात्र व्हावे असे आवाहन मांगेली तळेवाडी येथील श्री महागणपती मंदिर व्यवस्थापन कमिटीचीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!