आंदुर्ले गावातील दिशा स्वयंसहाय्यता महिला गटास सांगली जिल्ह्यातील (CRP) यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली*
*आंदुर्ले गावातील दिशा स्वयंसहाय्यता महिला गटास सांगली जिल्ह्यातील (CRP) यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली*
आंदुर्ले गावातील दिशा स्वयंसहाय्यता महिला गटास सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ तालुका येथील उमेद अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती (CRP) यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली.अभ्यास दौऱ्यात त्यांनी दिशा गटाच्या गांडुळखत निर्मिती प्रकल्पास भेट दिली.दिशा गटाने उत्पादन होणाऱ्या मालाची सिंधुसरस, गोवा सरस (मडगाव गोवा),महालक्ष्मी सरस (मुंबई – बांद्रे) येथे विक्री केलेला आहे.
दिशा गटाच्या या कार्याची विशेष दखल घेऊन राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते कोकण विभागातील मानाचा राजमाता जिजाऊ या प्रथम क्रमांक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
आजमितीस दिशा गटाने आपल्या ४गांडुळखत बेड ची संख्या १०पर्यंत आणलेली आहे. त्यांच्या हया कार्यास माजी सरपंच श्री. संतोष घनःश्याम पाटील व सौ. पूजा विश्वजीत सर्वेकर यांचे विशेष योगदान व मार्गदर्शन लाभलेले आहे.
हा अभ्यास दौरा कवठेमहाकाळ तालुका समन्वयक सन्मा. श्री. संदिप धोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली.
श्री. संदिप धोकटे यांनी यापुर्वी कुडाळ तालुका समन्वयक म्हणून उत्कृष्ट काम करून आपल्या कामातून महिला गटांना माहिती व मार्गदर्शन करण्यात विशेष ठसा उमटवलेला आहे.कवठेमहांकाळ तालुका पंचायत समिती मधील श्री.विनायक जाधव, श्री.उमेश कौलगे, श्री.बाळु कांबळे, सौ.रेश्मा आठवले व तालुक्यातील १७ CRP व बॅंकसखी यांनी अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली.
तसेच कुडाळ तालुक्यातील उमेद , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभिमान मधून तालुका कृषी व्यवस्थापक सौ. रसिका राणे , प्रभाग व्यवस्थापक सौ. समीक्षा धुरी उपस्थित होत्या.

