🟥 बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबीर २२ पासून..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०६:-* येथील सुशिला गणेश निगुडकर ट्रस्टचे डॉ. संजय निगुडकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर आणि मूळ सिंधुदुर्गातील व सध्या मुंबईस्थित डॉ. अमेय देसाई यांनी सुरू केलेल्या जिल्ह्यातील गरजवंत बालरुग्णांच्या शस्त्रक्रिया शिबिराचा उपक्रम २२ व २३ एप्रिल रोजी येथील महिला-बाल रुग्णालयात आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने डॉ. श्रीपाद पाटील यांच्या सहकार्याने हे शिबीर होत आहे. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक व मुंबईतील सायन रुग्णालयातील बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. पारस कोठारी आणि त्यांची टीम दोन दिवस गरजवंत लहान मुलांवर विनामूल्य तत्वावर शस्त्रक्रिया करणार आहेत. शिबिरात हर्निया, हायड्रोसील, अन-डिसेंडेड टेस्टीस, अपेंडिक्स, हायपोस्पाडिया अशा शस्त्रक्रिया होणार आहेत. अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच शिबिरातील बालरुग्णांसोबत रुग्णालयात राहणाऱ्या एका पालकाची भोजनाची व्यवस्था रोटरी क्लब ऑफ कुडाळच्यावतीने करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शस्त्रक्रियांना सुरूवात होणार आहे. रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणतः पंचवीस शस्त्रक्रिया होणार आहेत, असे डॉ. अमेय देसाई यांनी सांगितले. या शिबिराचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. निगुडकर, गाळवणकर आणि डॉ. देसाई यांनी केले आहे…
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

