स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेत शिवसेना कार्यकर्त्यांनीतसेच सावरकरप्रेमीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांचे आवाहन
सावंतवाडी: दि०३:- देशात स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. देशासाठी स्वातंत्रवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. वारंवार त्यांच्या पश्चात त्यांचा अवमान केला जात आहे. स्वातंत्रवीर सावरकर हे देशासाठी गौरवास्पद आहे. सर्वसामन्याला त्यांच्या शौर्याचे कौतुक आहे, अभिमान आहे.
अशा थोर नेत्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी, त्यांचा गौरव होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यभर विधानसभा क्षेत्रश: स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून सोमवार दिनांक ३-०४-२०२३ रोजी संध्याकाळी ठीक ३.३० वाजता सावंतवाडी शहरातून सावंतवाडी संस्थानचे राजे बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सावंतवाडी विधानसभा मतदार संघ ( सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग ) तालुक्यातील विविध हिंदूत्ववादी संघटना शिवसेना/ बिजेपी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अराजकीय नागरिक यांची सावंतवाडी शहराच्या प्रमुख मार्गावरून गौरव यात्रा निघणार आहे. तरी विविध संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने गौरव यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केले आहे.

