कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सांगली डेपोची मालवाहक गाडी बाजारपेठेत पटवर्धन चौकात अडकली..

▪️शहरात दुकाने थेट रस्त्यावरच मांडली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.२२: शहरात रस्त्यांवरच हातगाडी विक्रेते व अन्य दुकाने मांडली जात असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार होत आहे. रविवारी दुपारी सांगली डेपोची एस.टी. ची मालवाहक गाडी बाजारपेठेत येत असताना पटवर्धन चौकातच रस्त्यालगत विस्तारलेल्या दुकानांमुळे येथे काही काळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पटवर्धन चौकातील सर्विस रोड वरून बाजारपेठेत रस्त्यावर मालवाहक एस.टी.चा टर्न बसत नसल्याने ही समस्या निर्माण झाली होती. अखेर अथक प्रयत्नानंतर ती मालवाहक एस.टी. बाजारपेठेत गेली. मात्र, तोपर्यंत अगदी हॉटेल मंजुनाथ पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहनचालकांचा नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत गेले काही दिवस दुकाने थेट रस्त्यावरच मांडली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असते. त्यातच पटवर्धन चौकापासून महामार्ग चौपदरीकरनातंर्गत फ्लाय ओव्हर ब्रिज चे काम सुरू असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असते. याबाबत नगरपंचायत कडून रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेते व हातगाडी विक्रेत्यांना सूचना देत कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*

_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_

*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*

*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..

*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰

*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰

🏃🏻‍♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻‍♀️

*🔮 आमचा पत्ता 🤷🏻‍♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

One thought on “सांगली डेपोची मालवाहक गाडी बाजारपेठेत पटवर्धन चौकात अडकली..

  • subhash piralkar

    तसं नाहि त्यामागे राजकारण आहे.सांगली डेपोचीच गाडी का अडकली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!