करियरमुंबईशैक्षणिकसामाजिक

मुंबईचे युवा पत्रकार शुभम पेडामकर समाजरत्न सन्मानपत्राने सन्मानित..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : महेश कदम

🎴मुंबई,दि.२१: समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज पत्रकारिता क्षेत्रामुळे चहू दिशांचा आढावा लोकांना घरबसल्या मिळत आहे.

पत्रकारिता क्षेत्रात येऊन अत्यंत कमी वयात स्वबळावर स्वतःची प्रतिमा निर्माण करणाऱ्या मुंबईतील फोर्ट परिसरात राहणाऱ्या युवा पत्रकार शुभम रेखा शंकर पेडामकर ह्यांना प्राईड ऑफ कोल्हापूर न्यूज चॅनेलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी अत्यंत कमी वयात यश संपादन केले आहे.

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी शुभम ह्यांनी एकूण २६ महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांचा कार्याचा उलगडा केला आहे. तसेच २० पेक्षा अधिक करिअर संदर्भात मार्गदर्शनवर मुलाखती देखील घेतल्या आहेत.

त्याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजन इ. विषयांवरील हजार पेक्षा जास्त बातम्या केल्या आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमधून ते स्वतःला नेहमी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा आलेल्या दीपारंभ दिवाळी अंकासाठी संपादकीय साह्य म्हणून काम केले असून त्यात देखील बड्या मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत.

शुभम यांच्या कार्याबद्दल त्यांना आंबेडकर स्टुडंट असोसिएशन कडून आदर्श पत्रकार, अप्रतिम मीडिया, औरंगाबाद कडून चौथा स्तंभ पुरस्कार, आदर्श मुंबई कडून आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले आहेत आणि नुकताच मनुष्य विकास बळ यांच्या कडून राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

त्यांच्या या यशाचे श्रेय ते त्यांचे आई-बाबा (रेखा शंकर पेडामकर), भाऊ (अभिलाष), शिक्षकांमध्ये उपप्राचार्य प्रा.डॉ. महेश पाटील आणि प्रा.डॉ. विमुक्ता राजे यांना देतात. त्यांच्या सन्मानाबद्दल संपूर्ण स्तरावरून त्यांच्यावर कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव सध्या होत आहे.

*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*

*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*

*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*

_🏃🏻‍♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻‍♀️

*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*

*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!