सामाजिक

समीर नलावडे व गोट्या सावंत मित्रमंडळ आयोजित रंगोत्सवात रंगली अवघी कणकवली

रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर बेधुंद नाचत शहरवासीयांनी लुटला आनंद

 

कणकवली (प्रथमेश जाधव)

कणकवली शहरात मंगळवारी ठिकठिकाणी विविध रंगाची मुक्तपणे उधळण करत लहानांपासून थोरांपर्यंत, बच्चेकंपनीपासून तरुणाईपर्यंत साऱ्यांनीच रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा केला. रंगपंचमीनिमित्त शहरातील मंडळांनी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात डीजे, बॅन्जो, रेन शॉवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधांचा आनंद लुटतानाच तरुणाईने बेधुंद झाल्याची पहायला मिळाली. दुपारी १ ते ६ या वेळेत या रंगोत्सवाचा आनंद शहरवासीयांनी घेतला.

 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत मित्रमंडळाततर्फे रंगोत्सवाचे आयोजन केले होते. यात बच्चेकंपनीसह महिला व पुरुष सहभागी झाले होते. त्यांनी एकमेकांवर रंगांची उधळून करून रंगोत्सवाचा आनंद लुटला. रंगांची उधळण करत डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला. या रंगोत्सवात नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, डॉ. विद्याधर तायशेटे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, अशिये सरपंच महेश गुरव, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण, आनंद पारकर, स्वप्नील चिदंरकर आदी सहभागी झाले होते. या रंगपंचमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!