कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 १५ वित्त आयोगातून ग्रामपंचायत निगुडे येथे महिलांना कापडी पिशव्यांच्या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴बांदा, दि-२०:-* ग्रामपंचायत, निगुडे १५वित्त आयोगामार्फत महिलांना व्यवसाय प्रशिक्षण कोल्हापूर संस्थेमार्फत देण्यात आले.यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय देसाई, प्रशिक्षणार्थ श्री.प्रकाश पाटील यांनी प्रशिक्षण दिले.स्त्री शिक्षणाच्या जनक जननी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दिनांक १५ मार्च ते १८ मार्च पर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम गावात तीन ठिकाणी ठिकाणी चालला. या तीन दिवसीय प्रशिक्षणार्थ ५० महिलांनी प्रशिक्षण घेतले. व अनेकांनी कापडी पिशव्या बनविल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशासेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर यांनी केलं.यावेळी कोल्हापूर व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय देसाई यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की कोणताही व्यवसाय किंवा त्याचे प्रशिक्षण घेत असताना महिलांनी ते घेतल्यानंतर त्यातून मी पहिल्यांदाच असं बघितलं की रात्री दोन दोन वाजेपर्यंत महिलांनी सदर कापडी पिशव्या बनवल्या. खरोखर ही बाब निगुडे गावासाठी कौतुकास्पद आहे.आपण व्यवसाय प्रशिक्षण घेतलात आणि त्यातून आपण काहीतरी एक ऊर्जा निर्माण केली.हे पाहून मी खरोखर भारावून गेलो.असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी निगुडे गावचे सरपंच श्री. लक्ष्मण निगुडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत असताना गावातील महिलांनी सक्षमपणे पुढे यायचं आणि व्यवसाय उद्योग करायचा माझ्या परीने जे सहकार्य असेल, ते मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास करीन असं वचन देतो.आपण या १५० ते २०० कापडी पिशव्या विविध ११ प्रकारच्या बनवल्यात खरोखर कुठेतरी महिलांसाठी दहा टक्के निधी ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिलांसाठी असतो त्याचा पुरेपूर उपयोग झाला. असं मला एकंदरीत वाटतं पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं कौतुक आणि या प्रशिक्षणामध्ये बघायला गेलो तर वय वर्ष ७० असणाऱ्या सौ. सविता गावडे यांनी एक बॅग बनवली खरोखर हे सुद्धा एक मोठा कौतुक आहे.यावेळी माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी सांगितलं की या प्रशिक्षणात गेले तीन दिवस मी ११ प्रकारच्या पिशव्या मग पर्स, असून दे ट्रॅव्हल बॅग, असून दे मुलांचे दप्तर असून दे हे पूर्णपणे मी शिकले.खरोखर प्रशिक्षणार्थी पाटील सरांचं मी अभिनंदन करते की त्यांनी रात्री दोन दोन वाजेपर्यंत प्रत्येक वाडीत फिरून गावात ज्यावेळी प्रशिक्षण सुरू झालं त्यावेळी त्यांनी शिलाई मशीन पण बिघडलेल्या त्यांनी चालू केल्या म्हणजे कुठेतरी ग्रामपंचायत च्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना या व्यवसायातून एक रोजगाराची संधी निर्माण केली हे आमच्यासाठी आम्ही आमचे भाग्य समजतो.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शेवटी आमचा गाव विकासाचा ध्यास असे गाणे म्हणून शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संजय देसाई, प्रशिक्षणार्थी श्री प्रकाश पाटील, निगुडे गावचे विद्यमान सरपंच लक्ष्मण निगुडकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, माजी उपसरपंच गुरूदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे, शमिता नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य ईशा तुळसकर, विषया गवंडे, सीआरपी संजना केसरकर, संजना गावडे, महिला बचत संघ अध्यक्ष सदस्य महिला, युवती असे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी ग्रामपंचायत सदस्य साक्षी गावडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!