यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांना रक्षाबंधन करून दिली अनोखी भेट
सावंतवाडी तालुक्यातील चराठा वजरवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज शहरातील नाक्या नाक्यावर वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांना रक्षाबंधन करून त्यांना अनोखी भेट दिली.
सकाळपासून शहरातील नाक्यावर वाहतूक व्यवस्था सांभाळून नागरिकांचे जीवन सुलभ,व सुरक्षित ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांना आपल्या दैनंदिन कामकाजामुळे कधी कधी रक्षाबंधन ही करता येत नाही, अशा पोलिसांना मायेची उभारी देत आज यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन करून अनोखी भेट दिली. भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी विद्यार्थिनींबरोबर शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

