कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सहा दिवसानंतर स्टॉलधारक महिलांचे उपोषण स्थगित

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वैभववाडी, दि.१४:* वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव मोहिमेमध्ये विस्थापित झालेल्या स्टॉलधारक महिलांनी तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर गेले सहा दिवस सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्या काही महिलांची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय व ओरोस येथे उपचारासाठी हलविले आहे. सहा दिवस महिला उघड्या मंडपातचं उपोषण सुरू होते. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांनी सोमवारी तहसीलदार व उपोषणकर्त्यांची चर्चा केली. मंगळवारपासून सरकारी कर्मचारी संपावर जाणार असून उपोषणकर्त्यांकडे कोणीही लक्ष देणार नाही. त्यामुळे हे उपोषण स्थगित करुन आपला न्यायालयीन लढा व आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत चालू ठेवा. एक दिवस नक्कीच आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास कांबळे यांनी महिलांना दिला. उपोषणकर्त्यांच्या प्रश्नासंदर्भात प्रशासकीय पातळीवर आपले म्हणणे आपण वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. त्यानंतर महिलांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संबंधितांनी लिंबू सरबत देऊन उपोषण थांबविण्याची विनंती केली. यावेळी नायब तहसीलदार अनंत कवळेकर, यमगर, पाटील, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक बावरे तसेच नगरसेविका अक्षता जैतापकर, मनोज सावंत, माजी सभापती मीनाताई बोडके, भालचंद्र जाधव, प्रा. संजीवनी पाटील, विद्या पाटील, मानसी सावंत, अॅड. प्रताप सुतार, भीमराव कांबळे, शिवाजी राणे, विनोद कदम, सुरेश कर्पे, अनिल कदम यांच्यासह स्टॉलधारक महिला उपस्थित होत्या. उपोषणकर्त्यांनी आम्ही आमच्या पोटासाठी लढत आहोत आम्हाला स्टॉल लावून न्याय द्या, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक म%

error: Content is protected !!