🟥 मॅक्सीकॅब वाहनांना परवानगी देण्यास सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेचा विरोध
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१०:-* शासनाने मॅक्सीकॅब सारख्या वाहनांना परवानगी देण्याचे चुकिचे धोरण आखत आहे. मुळात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला सक्षम करण्याची गरज असताना एसटी कामगारांना भिकेला लावून मॅक्सीकँब सारख्या वाहनांना परवानगी देण्याचे चुकीचे धोरण शासन आखत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये कामगारांनी संप पुकारल्यामुळे एसटी महामंडळ सध्या प्रचंड आर्थिक संकटात आहे. अशावेळी मॅक्सीकॅब सारख्या वाहनांना परवानगी दिल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होऊन आर्थिक संकटाचे प्रमाण अधिकच गडद होऊन महामंडळ डबघाईला येऊ शकते. त्यामुळे प्रवासी जनतेस आवश्यकतेनुसार प्रवासी वाहतूक उपलब्ध करून देण्यास अडचणीचे होणार आहे. तसेच एसटी महामंडळातील कामगारांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून मॅक्सीकॅबला शासनाने परवानगी देऊ नये.
मुख्य म्हणजे एसटी महामंडळाच्या आवारात संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा स्टॅन्ड आहेत. व एसटी रिक्षा यांचे एक अतूट नाते आहे .बाहेरगावावरून आलेले प्रवासी शहरातल्या शहरात इच्छित स्थळी रिक्षांच्या माध्यमातून छोट्या गावागावात वाड्यावाड्यात पोहोचविले जातात. व एसटी बसेसच्या वेळेनुसार इच्छित स्थळावरून एसटी डेपो मध्ये रिक्षाने प्रवासी एसटी मधून जाण्यासाठी एसटी डेपो मध्ये सोडण्याचे काम रिक्षाचालक गेली कित्येक वर्ष करीत आहेत. यामुळे एसटी महामंडळाचे व रिक्षा संघटनांचे एक अतूट नाते आहे. यामुळे एसटी आहे म्हणून रिक्षा आहे. हे एसटीच्या संपाच्या वेळी गेल्या वर्षी रिक्षा चालकांनी व एसटी कामगारांनी अनुभवले आहे. त्यामुळे शासनाने मॅक्सीकॅबला परवानगी देऊ नये.
मुख्य म्हणजे राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. व याचा फटका एसटी महामंडळाला व रिक्षा व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. एक तर जिल्ह्यात रिक्षा लावायला जागा नाही तरीही शासनाकडून परवाने बंद केले जात नाही . तरी शासनावर याचा परिणाम नाही .व मॅक्सिकॅब वाहतुकीला परवानगी द्यावी अशी जनतेची मागणी नाही .तरीही शासनाने मॅक्सीकॅबला परवानगी देण्याचे धोरण आखल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ एसटी महामंडळाच्या खंबीरपणे पाठीशी राहून मॅक्सिकॅबला विरोध करणार असे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग नंदकुमार काळे यांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय शालब्रिद्रे जिल्हा सेक्रेटरी सुधीर पराडकर, सुनील आचरेकर, दत्ताराम सावंत, गोटया गावडे जिल्हा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

