सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील आदिवासी मुलांना दिवाळी निमित्त केले फराळाचे वाटप..
प्रतिनिधी – राकेश परब
बांदा :२०-सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी गावात जाऊन दिवाळीच्या निमित्ताने मुलांना फराळ देण्यात आला. त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
कोरोनाचं सावट असल्याने यावर्षीची दिवाळीचा उपक्रम यावर्षी करायचा का? हा प्रश्न मनात येऊन गेला. पण त्या विभागातील प्रकाशजी फाटे यांच्या कडुन सुधागड तालुक्यातील ठाणाळे आदिवासी गांवातील एकूण परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्यानुसार सिंधुदिशा टिमने सर्व कोरोना सबंधित काळजी घेऊन दिवाळीच्या उपक्रमात फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुधागड तालुक्यातील ठाणाळे या आदिवासी गावांतील प्रत्येक कुटुंबियांला मास्कची माहिती दिली.यावेळी मास्कचं वाटप व दिवाळीचा फराळही वाटप दिपाळी साजरी करण्यात आली.
सध्या दिवाळीत फटाके फोडावेत की नाही हा प्रश्न ऐरणीवर आहे. फटाके फोडावेत की फोडू नयेत याबद्दल मला काही म्हणायचे नाही पण अशा पाड्यांवर गेलं की एक जाणवतं, या मुलांची गरज फटाके नाहीत. फटाक्यांपेक्षा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणं गरजेचं आहे. सिंधुदिशाच्या माध्यमातून आम्ही या मुलांपर्यंत पोहोचून त्यांच्या मूलभूत गरजा काहि प्रमाणात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय, याचा अभिमान आहे. असे उद्गागार सस्थेचे अध्यक्ष रुपेश परब यांनी काढले. यावेळी ठाणाळे ग्रामपंचायत सरपंच, सद्स्य़, ग्रामस्थ व सिंधुदिशा टिमचे कार्यकर्ते राजेश सावंत,विलास गवस,विलास राऊळ, संतोष ओटवणेकर, रजत गवस ,प्रशांत परब, मुकेश नाईक,वैभव गवस,वैष्णवी गवस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप मेहनत घेतली.

