🟥कुडाळ न.पं.चा २३ कोटीचा शिलकी अर्थसंकल्प सादर
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.०१:* कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबरोबरच आरोग्य, पाणी, स्वच्छता, महिला व बालविकास तसेच नागरिकांसाठी तरतुद केलेला २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे महसुली व भांडवली मिळून २३ कोटी ३६ लाख रुपये शिलकी रकमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा आफरिन करोल यांनी मंगळवारी सभागृहात सादर केले. हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले. ही सभा नगराध्यक्षा करोल यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट तसेच नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी सुरज कांबळे, प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक तसेच सर्व विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल स्वप्नील पाटील यांनी केले. या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक २२ कोटी ४१ लाख ४ हजार ८६१ रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. तर एकूण महसुली जमा ६ कोटी ७० लाख ८० हजार ७०० रुपये दाखविण्यात आली आहे. एकूण महसुली खर्च ६ कोटी ६६ लाख ४७ हजार ३०६ रुपये आहे. भांडवली जमा १७ कोटी ४० लाख ५७ हजार ३१० रुपये व भांडवली खर्च १६ कोटी ४९ लाख ६ हजार ९३६ रुपये दाखविला आहे. २३ कोटी ३६ लाख ८८ हजार ६२९ रुपये शिलकी रकमेचा अर्थसंकल्प सर्वानुमते संमत करण्यात आला.
या अर्थसंकल्पात हायमास्ट खरेदी, पाणी योजना, सक्शन मशीन, रस्ता दुरुस्ती, नवीन वाहन खरेदी, बायोगॅस प्लान्ट, नवीन उद्यान व शहर विकासासाठी तरतुद करण्यात आली आहे. वृत्तपत्र प्रतिनिधींना या सभेपासून दूर ठेवण्यात आले होते. सभेची नोटीसही देण्यात आली नव्हती.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

