आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दिग्विजय फडके यांचा निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि.२२ :- आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या मार्फत वेगवेगळ्या गटात निबंध स्पर्धा आयोजीत केल्या होत्या त्या मध्ये खुल्या गटातील जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत ” सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची नवी दिशा” या निबंधाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालेबद्दल दिग्विजय फडके यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते रोख 12,500/- , सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. दिग्विजय फडके हे साटेली भेडशी ता. दोडामार्ग येथील शाळेत प्राथमिक शिक्षक असून ते एक उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत या अगोदर त्यांनी विविध जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील निबंध स्पर्धेत भाग घेऊन उज्ज्वल यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचें सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!