🟥 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाईक स्वार व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यागनार कार रस्त्यावरून 25 फूट खाली शेतीमध्ये गेल्याने मळगांव येथे अपघात
*🟥 अपघातात विष्णू जाधव नामक गाडी मालक जखमी ; भिल्लवाडी ग्रुपचे मदतकार्य..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-२२:-* स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाईक स्वार व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यागनार कार रस्त्यावरून 25 फूट खाली शेतीमध्ये गेल्याने काल सोमवारी घडलेल्या अपघातात विष्णू जाधव नामक गाडी मालक जखमी झाले.सुदैवाने त्यांचा जीव वाचला. ही घटना काल कोकण क्राऊन हॉटेल परिसरात घडली.
या अपघाताची माहिती मळगांव येथील भिल्लवाडी ग्रुपला मिळताच या ग्रुपचे पांडुरंग राऊळ,सचिन राऊळ, अंकुश राऊळ,दिपेश राऊळ, निखिल राऊळ,मयूर गावकर,उत्तम राऊळ, कृष्णा राऊळ,न्यानु राऊळ,प्रथमेश राऊळ,महादेव राऊळ,अरुण राऊळ,प्रथमेश राऊळ,अरुण राऊळ
यांनी स्वतःच्या कामाची पर्वा न करता धावत येवून त्या गृहस्थाची गाडी खेचून वर काढली.यावेळी वयस्कर गृहस्थ विष्णू जाधव(गुलदुळे आरोंदा)यांनी नम्रपणे भिल्लवाडी ग्रुपचे आभार मानले.ही घटना सायंकाळी 4.30 वाजता घडली.

