कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 वाशिष्ठी डेअरीच्या पाठिशी शेतकऱ्यांनी ठामपणे उभे राहावे ; सुभाष बने

 

*🟥 साडवली येथे दूध संकलन केंद्राचे मोठ्या थाटात उद्घाटन*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-२० :-* चिपळूण तालुक्यात सुरू झालेला वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प आपला स्थानिक प्रकल्प आहे. आपल्या हक्काचा प्रकल्प आणि आपल्या मातीतला प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, यासाठी स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार सुभाष बने यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या दूध संकलन केंद्राचे आज सकाळी श्री. बने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. बने म्हणाले, मोठमोठ्या बँकांनाही लाजवेल, असे काम चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे अविरत सुरू आहे. या पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यामुळे पतसंस्थेवर ज्या पद्धतीने आपण विश्वास दाखवलात, त्याच पद्धतीने वाशिष्ठी डेअरीवर विश्वास दाखवून हा आपला प्रकल्प आहे, असे समजून आपण सर्व शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
यावेळी मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक प्रशांत यादव यांनी डेअरीच्या स्थापनेपासूनची माहिती देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी श्री. यादव यांच्या हस्ते वाशिष्ठी डेअरीतर्फे माजी आमदार सुभाष बने यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुरेश ऊर्फ बारक्याशेठ बने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, साडवलीचे सरपंच राजू जाधव, देवरूख विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष लाड, सुबोध पेडणेकर, अशोक लिमये, नाना पोटफोडे, मुन्ना थरवळ, दिलीप बोधले, शैलेश भस्मे, मदन शिंदे, कोसुंबचे माजी सरपंच राजेश जाधव, अजित रेडीज, बाळ ढवळे, पंकज पुसाळकर, प्रियदर्शनी पतसंस्थेचे अध्यक्ष हनिफ हरचिलकर, दादा भोंडे, उल्हास मांगले, शिरीष झगडे, नितीन लोध, साडवलीचे माजी सरपंच संतोष जाधव, संतोष मांगले, संतो, बावधाने, समीर खामकर, मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे संचालक महेश खेतले, अविनाश गुढेकर, प्रशांत वाजे, व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांच्यासह संगमेश्वर आणि देवरूख परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🍫आपल्या सिंधुदुर्गात पहिलीच “चॉकलेट फॅक्टरी”… आणि तेही 🥳आपल्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव मध्ये…!🍬_*

*🍡श्री गणेश चोकोबाईटस्🍬*
_(चॉकलेट फॅक्टरी)_

*♦️उपलब्ध उत्पादने:-*
मिक्स ड्रायफ्रुट्स प्लेन चॉकलेट
ड्रायफुट कोटिंग चॉकलेट
कस्टमाईज चॉकलेट
फिलिंग चॉकलेट

*💥खास आकर्षक उत्पादने उपलब्ध:-*
🔸फेस्टिव्हल कलेक्शन
🔸किड्स कलेक्शन
🔸स्पेशल चॉकलेट बुके

*💥केक आणि पेस्ट्रीस उपलब्ध:-*
▫️आईसकेक
▫️पेस्ट्रीसकेक
▫️जार केक
▫️रोल केक
▫️फ्लेवर्ड केक
▫️चॉकलेट केक

*🍰🎂ऑर्डर प्रमाणे केक बनवून मिळतील….!🧁*

*🛑काजू,बदाम,खजूर कोकम, लेमन, मॅगो सरबतसह “कोकणी मेवा” उपलब्ध*

*🧃श्री गणेश सॉफ्ट ड्रिंक ड्रायफूट आणि आईस्क्रिम हाऊस…!🍨*

*🫖विन तंदूर चहा☕*
डिफरंट टेस्ट युनिक टेस्ट !

*🤩आमच्या फॅक्टरीला आवश्य भेट द्या…!🥳आणि चाखा आमच्या अनोख्या चॉकलेटची चव..!!🤠*

*🎴संपर्क व पत्ता :-*
*श्री गणेश चोकोबाईट्स चॉकलेट फॅक्टरी*
_प्रोप्रा.ज्योती सुरज कोरगांवकर_
_पत्ता : कुंभार्ली – मळगाव, सोनुर्ली तिठा, मुंबई-गोवा हायवे, सावंतवाडी-सिंधुदुर्ग_

9920057769
9422054871
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!