पाळत ठेवणाऱ्यांना कुडाळ तहसीलदारांचा दणका
पाळत ठेवणाऱ्यांना कुडाळ तहसीलदारांचा दणका
कुडाळ
अनधिकृत वाळू चोरीच्या अनुषंगाने
नायब तहसीलदार व तलाठ्याला
वाळू व्यावसायिकांकडून मारहाणीची
घटना ताजी असताना आपल्यावर
पाळत ठेवणाऱ्यांना धाक दाखविण्याचे धाडस कुडाळचे तहसीलदार अमोलपाठक यांनी बुधवारी रात्री केले. त्यांनी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर समोरच्या एका
इमारतीकडे संशयित मोटारसायकल स्वारांच्या दिशेने आपल्या ताब्यातील शासकीय वाहन बेधडक नेले. तेव्हा तेथे पाच मोटारसायकल टाकून मोटारसायकलस्वारांनी पळ काढला.
त्या पाच मोटारसायकल तहसीलदार यांनी ताब्यात घेतल्या. अनधिकृत
वाळूला लगाम लावण्यासाठी पाठक यांनी अशी कारवाई केली. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार पाठक आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या पलिकडे असलेल्या तहसील कार्यालय जुन्या इमारतीसमोर काहीजणांची गर्दी दिसली. पाठक आपल्या ताब्यातील शासकीय वाहन घेऊन बाहेर पडले. त्या संशयितांना हटकण्यासाठी त्यांनी चालकाला वाहन त्या दिशेने न्यायला सांगितले. ते वाहन आपल्या दिशेने येईल, याची कल्पना त्या स्वारांना नव्हती. परंतु अचानक आपल्याच दिशेने तहसीलदार यांचे वाहन आल्याने त्यांनी मोटारसायकल तेथेच टाकून पळ काढला.
