सावडावच्या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा तो बनावच
सावडावच्या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा तो बनावच
कणकवली
सावडाव येथे शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा झालेला प्रयत्न हा विद्यार्थ्यांनीच केलेला बनाव असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण
विभाग व कणकवली पोलिसांनी केलेल्या तपासात घटनाक्रम व पुरावे पहिल्यानंतर पोलिसांनी हे कोडे उलगडले विद्यार्थ्यांनीही याबाबत कबुली दिली असून शाळेत सांगितलेली प्रार्थना पाठ न झाल्याने त्यांनी हा बनाव रचल्याचे पुढे आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली.
सावडाव शाळेतील सहा मुलांना १३ फेब्रुवारीला एका वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याचे मुलांनी सांगितले होते. पोलिसांसह इतर प्रशासनही कामाला लागले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सावडाव येथे भेट दिली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कसून तपास केला. यावेळी सावडावकडे जाणाऱ्या मार्गावरील शक्य होतील तेवढे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासले होते. मात्र त्या दरम्यान कोणतेही संशयित वाहन सावडावकडे जाणारे आढळले नव्हते. पोलिसांनी तांत्रिक अंगाच्यादृष्टीनेही तपास केला. विद्यार्थी ज्या ठिकाणी घटना घडली म्हणून सांगत होते, तेथील व इतर ठिकाणच्याही पाऊलखुणा ही तपसण्यात आल्या मात्र विद्यार्थी सांगत असलेली घटना व क्रम अत्यंत विसंगत असल्याचे थोडे येत होते अखेर पोलिसांनी खोलवर जाऊन चौकशी केली असता मुलांनी आपण अपर्णाचा बनाव र असल्याचे कबूल केले.
प्रार्थना पाठ झाली नाही म्हणून
सदरच्या मुलांना शाळेत एक प्रार्थना पाठ करण्यासाठी शिक्षकांनी सांगितले होते मात्र प्रार्थना पाठ न झाल्याने आपल्याला ओरडतील इतर विद्यार्थ्यांसमोर आपला कमीपणा होईल या भीतीने या मुलांनी हा बनाव रचल्याचे पोलीस तपासात पुढे आले
जिल्हा पोलीस अधक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या तपासात पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, प्रमोद काळसेकर, -अनुपकुमार खडे, कृष्णा केसरकर, तसेच पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व कणकवली पोलीसही सहभागी झाले होते.
